Dipak Askand

Wednesday, September 7, 2011

पुन्हा पुन्हा....हे कुठपर्यंत चालणार?

पुन्हा दिल्लीत बोंम्बस्फोट झाला,
पुन्हा मृत्युचे तांडव झाले,
आता पुन्हा निषेध होणार, पुन्हा राजकीय नेत्यांच्या भेटी, पुन्हा मदतीच्या घोषणा,
पुन्हा चोंकशी समित्या, पुन्हा त्यात घोटाळे होणार, पुन्हा त्याला राजकीय रंग मिळणार,
पुन्हा पाकिस्तानला ताकीद देणार, काही दिवसांनी पुन्हा सगळे विसरणार,
पुढचा स्फोट झाल्यावर या स्फोटची उजळनी होणार,

ज्यांचे नातेवाइक जाणार त्यांचे जीवन भराचे झालेले नुकसान कधीही भरून नाही येणार,
वर्षानुवर्षे खटले प्रलंबित राहणार, कधीतरी त्यावर निकाल लागणार,
कदाचित आरोपी तोपर्यंत सापडलेले असणार, कदाचित त्यांना फाशी ची शिक्षा होणार,
ते पुन्हा राष्ट्रपतिंकड़े अपील दाखल करणार, त्यालाही बरीच वर्षे लागणार,
तोपर्यंत आरोपी मजेत तुरुगात हाय-सिक्यूरिटी मध्ये राहणार,
तोपर्यंत अजुन कित्येक बोंम्बस्फोट झालेले असणार
त्यांचीही चोंकशी चालू होणार, पुन्हा पुन्हा पुन्हा तेच होत राहणार .....

ठरवा आता हे कोणी बदलायचे? की आपण वाट पाहत राहणार आपल्या घरातले कोणी बळी जाणार याची ???

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]



<< Home